Friday, 20 May 2016


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

साहित्यमंथन आयोजित काव्यमंथन चारोळी स्पर्धा क्र - 37

विषय :- *गुलमोहर फुलला

परीक्षण :- सुनंदाताई पाटील
संकलन :-  उत्कर्ष देवणीकर सर

ग्राफिक्स :- क्रांती बुद्धेवार सर

वेळ :- सकाळी 10 ते सायं 5

 स्पर्धा सर्वांसाठी खुली

स्पर्धेसाठीची चारोळी

9679077239 या क्र .वर पोस्ट करावी

  स्पर्धकांनी जास्तीत जास्त 2 चारोळ्या पोस्ट कराव्यात !

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
संकलन

************************

काव्यमंथन चारोळी स्पर्धा क्र 37
        🌺 गुलमोहर फुलला🌺

भर उन्हात तापून माझा
देह लालेलाल झाला ।
जनास वाटे अहाहा  किती
छान गुलमोहर फुलला ।
 @ अरविंद कुलकर्णी
( स्पर्धेसाठी नाही )
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌺🌺🌾🌾🌾🌾🌾

🎊🎊🎊●●●●🎊🎊🎊
 काव्यमंथन चारोळीस्पर्धा क्र.३७

गुलमोहर फुलला
स्पर्धेसाठी

वैशाखवणव्यातही गुलमोहर
     पहा कसा पानोपानी फुलला
दु:खावर मात करुनही हसणारा
     प्रत्येक शहीद कर्मयोगी ठरला

सुनीता सुरेश महाबळ@२१
////////////////////
२)

हसणा-यासंगे हसते दुनिया
    रडतराऊचची साथ कोणी न देई
 तीव्र उन्हात फुलणारा गुलमोहर
    जणू हाच संदेश देत हसत राही

सुनीता महाबळ@२१
🎊🎊🎊●●●●🎊🎊🎊
 काव्यमंथन
चारोळी स्पर्धा क्र.३७
गुलमोहर फुलला

अंगणात गुलमोहर फुलला
लाल फुलांनी बहरुन आला
ग्रीष्मातही पानोपानी बहरला
परिसरात फुलांचा सडा पडला
 प्राची देशपांडे
२-
ग्रीष्माने जीवाची काहिली झाली
गुलमोहराने परि किमया केली
पानोपानी बहरुनी आला
अंगणी गुलमोहरृ फुलला
 प्राची देशपांडे

🎊🎊🎊●●●●🎊🎊🎊
 आग ओकितो डोईवरती सूर्य सारखा सदा,
सारी धरणी रखरखीत तोहि आता करू लागला.
जळजळीत तप्त ते ऊन प्राशुनी तरूवर झाली निधडी,
लालचुटूक पाकळ्या फुलवूनी गुलमोहर फुलला.

डॉ.सुधीर अनंत काटे,निगडी,पुणे.
२०/५/१६
🎊🎊🎊●●●●🎊🎊🎊
 सुलभा कुलकणीॅ.    
काव्यमंथन चारोळी स्पधाॅ
पहाटेच्या त्या दवबिंदूच्या संगतीने
रंगीबेरंगी गुलमोहर फुलो-याने
पांघरली नवरंगी शाल धरतीने
ग्रीष्माला टाकले संभ्रमी सहजतेने.

🎊🎊🎊●●●●🎊🎊🎊
 चारोळी स्पर्धा!
अरविंदकाका ९६८९०७७२३९
गुलमोहर फुलला !
अंगणी गुलमोहर हा फुलला,
जरी ग्रिष्माचा वाढला चटका!

तरी आनंद देण्या सकळा ,
ना अपुला स्वधर्म विसरला !
सौ.निलाक्षी विद्वांस ६८
🎊🎊🎊●●●●🎊🎊🎊
‪+91 99216 19277‬: स्पर्धे साठी....
..
वैशाख वणव्याची धग..
माझ्या डोळ्यात रडते..
फुले गुलमोहर पाकळीने..
भुल जीवास पडते...
🎊🎊🎊●●●●🎊🎊🎊
‪+91 99216 19277‬: आला गुलमोहराचा गंध..
फुले ऊन्हात झळकती..
जणु वा-याची झुळुक..
देह मनास सुखावती...
🎊🎊🎊●●●●🎊🎊🎊
 काव्यमंथन
चारोळी स्पर्धा क्र.३७
गुलमोहर फुलला

वसंत ऋतु च्या आगमनाने
वटवृक्षाला आली लाली    
रम्य दृश्य ते पहाता
गुलमोहर फुलला गाली    
               कविता शिंदे.......२६
🎊🎊🎊●●●●🎊🎊🎊
 🌷 साहित्य मंथन 🌷
  🌹 चारोळी स्पर्धा 🌹 🍁🌿 क्रमांक३७ 🌿🍁
दुष्काळाच्या तीव्र झळा
आणि पाण्याची वानवा ।
तरीही या गुलमोहोराचा
कसा फुलून येतो ताटवा ॥
      @ ०५ डॉ.शरयू शहा.
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
 🌹चारोळी  स्पर्धा ३७ 🌹
महागाईचे चटचटते निखारे
आणि जलधारांची वानवा ।
शेतकऱ्यांच्या मनामध्ये गुलमोहोर कसा फुलावा ?॥
       @ ०५ डॉ. शरयू शहा.
🎊🎊🎊●●●●🎊🎊🎊
 स्पर्धेसाठी..

हृदयात आज माझ्या गुलमोहर फुलला,
का जीव माझा प्रिये तुझ्यावरी जडला,
मंत्रमुग्ध वाटतेय मला सृष्टी आज सारी,
जणू सुगंध प्रीतीचा चोहीकडे दरवळला..

निर्मला सोनी.
🎊🎊🎊●●●●🎊🎊🎊
 स्पर्धेसाठी......🙏
गुलमोहोर दिसे छान
ऊन्हात त्याची वेगळीच शान
भर ऊन्हातपण डोलतांना
निसर्गसंगीतच  देई सर्वांना.
.....राजेन्द्र .......३५
🎊🎊🎊●●●●🎊🎊🎊
 1) गुलमोहरांच्या सुमनांनी बहरली धरती
फुलांच्या पखरणीने सजली काळी माती
मन मोहक ते रंग ,मनामनाला सजवती
अशा भीषण दुष्काळातही ,मानवाला प्रसन्न करती

©  ३१ जागृती निखारे
🎊🎊🎊●●●●🎊🎊🎊
 " गुलमोहर फुलला"

१)"जैसा परपिडा सारण्या
संतजण देह झिजविला,
तैसा देण्या दिलासा सृष्टी
निष्पर्ण होऊन गुलमोहर फुलला"

  संगीता देशमुख,वसमत @५९
स्पर्धेसाठी👆🏻
/////////
 गुलमोहर फुलला

२)"तुझ्या मिठीत विसावताना
देह जगद्व्याप भुलला,
दुख निष्पर्ण होऊन
सौख्याचा गुलमोहर फुलला"
३)ऱणरणत्या जीवनात
सौख्याचा क्षण लाभला,
तुझ्या माझ्या प्रीतीचा बघ
कसा गुलमोहर फुलला!
4)रणरणत्या उन्हझळा,
तृषार्त जन,धरा,
सुसह्य करण्या उन्हाळा
गुलमोहर फुलला जरा
संगीता देशमुख
🎊🎊🎊●●●●🎊🎊🎊
 स्पर्धेसाठी....

कोपली का धरणी माय?
सुर्याने केला कहर
कधी बरसशील रे मेघा
पाहता वाट तुझी फुलला गुलमोहर

- सुनिल खंडेलवाल
पिंपरी चिंचवड, पुणे.
🎊🎊🎊●●●●🎊🎊🎊
 चारोळी स्पर्धेसाठी
"गुलमोहर फुलला"

वसंताच्या स्वागता गुलमोहराची,
उमलली लाल-केशरी फुले
शाळेला सुट्टी लागली म्हणुनी
जणू आनंदे नाचू लागली मुले
-डॉ.सखाराम भगत (१३)
मो.नं.९५२७५५७०६९
🎊🎊🎊●●●●🎊🎊🎊
 🍒काव्यमंथन==🍒
      स्पर्धेसाठी == क्रमांक 37
🍁विषय= गुलमोहर फुलला🍁
       ✍ प्रेषक == कुंदा पित्रे

1) ह्रदयी गुलमोहर फुलताना
     रात्र झाली चांदणी!
     भरला मनी सुगंध गाताना
     सरली जुनी कहाणी!
===
2)अंगणी, गुलमोहर फुलला
     होते छायेत ,नवे तराणे!
    मनोमनी तो अर्थ कळला
  भोगवट्यातहि कसे गावे गाणे!
====
कुंदा पित्रे (46)
शिवाजी पार्क
दादर ,मुंबई 28
🎊🎊🎊●●●●🎊🎊🎊
आठवणींचा गुलमोहोर फुलला
जमिनीवर बेधुंद होऊन सांडला
मनात भातुकलीचा खेळ  मांडला
वैशाखात हि चैत्र जरा वेळ रंगला

डॉ शिल्पा जोशी ,londan
🎊🎊🎊●●●●🎊🎊🎊
 स्पर्धेसाठी*

लाल रंगी रंगला प्रेमातूर
गुलमोहर अंगणी फुलला
न्याहाळीता तव रक्तिमा
मनी वसंत माझ्या खुलला ।

प्रा सौ शांता ठुबे  अहमदनगर
9850136419
🎊🎊🎊●●●●🎊🎊🎊
 गुलमोहरा रंग तुइाा आगळा
भडक रंगातही दिसतो बावळा
पांघरला तू शेला लाल गुलाबी पिवळा
भासतो ईश्वराचा खेळ निराळा.
छाया पाटील ९८६९६४३२६८.
🎊🎊🎊●●●●🎊🎊🎊
 वैशाख वणवेने होता काहिली
पावसाचा शिडकावा आला
मन सुखावूनी जाते
दारी गुलमोहर फुलला
अनुजा देशमुख@65
//////////////
नभ दाटूनी आले अंबरात
मेघ गर्जना झाली
मातीचा सुगंध दरवळला
आणि दारी गुलमोहर फुलला
अनुजा देशमुख@65
🎊🎊🎊●●●●🎊🎊🎊
बरसु दे रोहिणी,
फुलु दे गुलमोहर!
भिजुदे सारे शिवार,
येऊ दे बीजास अंकुर!

रामराव जाधव 04
🎊🎊🎊●●●●🎊🎊🎊
‪+91 84220 89666‬: चारोळ्यांचा हा गुलमोहर
सडा लालसर या भूमीवर
येता बहरून आला लहरत
सांज जाहली या हो लवकर
🎊🎊🎊●●●●🎊🎊🎊
गुल मोहरला बहरला
रकरकत्या ऊन्हात रंगला
काळ्या मेघसरींच्या स्वागतार्ह
गुल मोहरला सजला
                            समीर मुल्ला
       1999 पासून सातारकर 1 मे रोजी गुलमोहर दिवस साजरा करतात. https://mr.m.wikipedia.org/wiki/गुलमोहर_दिवस
🎊🎊🎊●●●●🎊🎊🎊
नाही त्याला ऊन्हाचा त्रास
नाही पहात तो पावसाची  वाट
शिकवण देतो तो सर्वांना
गुलमोहर फुलला पहा त्याचा थाट
🌺🍀🌺🍀🌺🍀🌺🍀🌺🍀

2)विधात्याची ही किमया पहा
     हिरव्या गालिच्यावर केशरी डौलात
      प्रतिकुलतेवर मात ही आहा
      गुलमोहर फुलला रणरणत्या ऊन्हात

3)गुलमोहर फुलला
    शितल त्याची छाया
    केशरी दाट गालिचा
    ही आभाळ माया

...🍁☘🍁☘🍁☘🍁☘🍁..
नयना कुलकर्णी
@15......स्पर्धसाठी  दोन घ्याव्यात
.......................................
🎊🎊🎊●●●●🎊🎊🎊
चारोळी स्पर्धा
विषय - गुलमोहर फुलला

लाल जाम्भळा पिवळा
फुलांनी अंगोअंगी फुलला
ग्रीष्माच्या ह्या ऋतूतही
गुलमोहर बहरला

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

प्रकर्ष सूर्य ओके उष्मा
ग्रीष्मात पर्णगळती झाली
मनास शीतलता देण्या पहा
गुलमोहराची ती फुले बहरली

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

होत असता अंगाची लाही लाही
पर्णगळती ने झाडेही न देई सावली
ऊष्म्याच्या ह्या झळांनी सुचेना काही
ऐसिया वातावरणी गुलमोहर फुले बहरली

👆(स्पर्धेसाठी )

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


संजय पाटील
@24
🎊🎊🎊●●●●🎊🎊🎊
* गुलमोहर फुलला *

दुःखी होती वीरान धरती,
सुख घेऊनी गुलमोहर फुलला,
पाहूनी सुंदर रूप तयाचे,
वसुंधरेचा चेहरा फुलला.

       _क्रांती बुद्धेवार
🎊🎊🎊●●●●🎊🎊🎊
 ‪+91 98702 51951‬: स्पर्धेसाठी, स्पर्धी३७'  गुलमोहोर फुलला''

शेज मखमली, रक्तवर्णी बघता
धरतीवर,
तप्त धरणीलाही येतो नव
चैतन्य बहर!
रणरणता वैशाख जाळितो जो,
अंगांगा अंगार,
पण त्यातही फुलतो,हसतो सुखवितो,
तो' गुलमोहोर'!!!

स्वाती केळकर, दादर, मुंबई २८










●●● संकलन समाप्त ●●●